पुणे जिल्ह्यातील एकूण सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या नऊशेच्या खाली

पुणे - पुणे जिल्ह्यातील एकूण सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या मंगळवारी (ता. १५) नऊशेच्या खाली आली आहे. शिवाय पुणे शहरातील सक्रिय कोरोना रुग्ण पाचशेच्या आत आले आहेत. जिल्ह्यातील एकूण रुग्णांपैकी विविध रुग्णालयांत केवळ ४९ रुग्णांवर उपचार सुरू असून उर्वरित ८४५ जण गृह विलगीकरणात आहेत. दरम्यान, मंगळवारी दिवसभरात जिल्ह्यात फक्त ६३ तर शहरात केवळ १८ नवे रुग्ण आढळून आले आहेत. याउलट दिवसभरातील जिल्ह्यातील २१७ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. यामध्ये पुणे शहरातील सर्वाधिक १३७ जण आहेत. दिवसातील नवीन रुग्णांमध्ये पिंपरी चिंचवडमधील १२, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील २१, नगरपालिका हद्दीतील नऊ आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रातील तीन जणांचा समावेश आहे. कोरोनामुक्त झालेल्यांमध्ये पिंपरी चिंचवडमधील ३१, जिल्हा परिषद २८, नगरपालिका १७ आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रातील चार जण आहेत. सद्यःस्थितीतील जिल्ह्यातील एकूण सक्रिय कोरोना रुग्णांपैकी पुणे शहरातील ४४५, पिंपरी चिंचवडमधील ११८, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील १८७, नगरपालिका हद्दीतील १२२ आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रातील २२ रुग्ण आहेत. मागील आठवडाभरापासून सातत्याने शून्य मृत्यू होत आहेत. जिल्हा आरोग्य विभागाच्यावतीने रोज रात्री जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या आकडेवारीचा अहवाल प्रसिद्ध केला जातो. या अहवालातून हे उघड झाले आहे.


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply