पुणे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात तरुणाचा मोबाइल हिसकावला

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तरुणाचा मोबाइल हिसकावून नेल्याची घटना घडली. याच परिसरात चार दिवसांपूर्वी एका तरुणाचा मोबाइल हिसकावून नेण्यात आला होता.

याबाबत श्रेयस चांडोळकर (वय २०,,रा. टिंगरेनगर) यांनी  बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. चांडोळकर जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील पीएमपी थांब्यावर थांबला होता. त्यावेळी चोरट्यांनी श्रेयसच्या हातातील मोबाइल हिसकावून नेला.

श्रेयसने आरडाओरडा केला मात्र चोरटे पसार झाले. चार दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात एका तरुणाचा मोबाइल हिसकावून नेण्याता आला होता. त्यावेळी नागरिकांनी आणि पोलिसांनी पसार झालेल्या चोरट्यांना पाठवलाग करून पकडले होते.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *