पुणे : जलवाहिनी फुटल्याने प्रचंड पाणी वाया

विश्रांतवाडी : येरवडा येथे एअर पोर्ट रोड मुख्य रस्त्यालगत यशवंतनगर भागात जलवाहिनी फुटल्याने प्रचंड पाणी वाया गेले. रात्री 10च्या सुमारास ही जलवाहिनी फुटली.पाणी वाया जात असल्याचे पाहून येथील संकल्प युवा प्रतिष्ठान तथा सामाजिक संस्थेचे विशाल भारस्कर यांनी प्रसंगावधान राखून त्वरित येरवडा क्षेत्रीय कार्यालयाच्या ढमढेरे यांना संपर्क करून सप्लाय बंद करण्यासाठी विनंती केली. त्यावेळी मनोज शिंदे, आकाश खंडागळे, शंकर शेलार, आकाश वायदंडे, यश वैराळ, शारुख शेख, कैलास देवडे. स्थानिक नागरिक आणि अधिकाऱ्यांच्या मदतीने पाण्याचा प्रवाह बंद करण्यात यश आलं आहे.

परंतु यामुळे आता रात्री व सकाळी पाणी पुरवठा होणाऱ्या भागाला भाट वस्ती ,यशवंतनगर , जनतानगर ,नवी खडकी , भोसले वस्ती , नेताजीनगर , गांधीनगर , जय प्रकाशनगर या भागाला पाणीपुरवठा होणार नाही. याची नागरिकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन मनपाच्या पाणीपुरवठा विभागातर्फे करण्यात आले आहे



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply