पुणे : छत्रपती संभाजीराजे स्वराज्यरक्षक की धर्मवीर? अजित पवारांमुळे भाजपा संतप्त

पुणे : विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्याच्या हिवाळी अधिवेशनात केलेल्या एका विधानामुळे मोठा वादंग निर्माण झाला आहे. त्यामुळे भाजपा आक्रमक झाली असून पुण्यामध्ये पवारांच्या निषेधार्थ आंदोलन होत आहे.

अजित पवारांनी छत्रपती संभाजीराजे यांच्याबद्दल एक विधान केलं होतं. "छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नव्हते, तर स्वराज्य रक्षकच होते", असं अजित पवार हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी म्हणाले होते, त्याचे पडसाद आता उमटत आहेत. नितेश राणे, चित्रा वाघ अशा भाजपाच्या काही नेत्यांनीही अजित पवार यांच्या या विधानाचा समाचार घेतला आहे. चला अजित पवारांना इतिहासाचा धडा शिकवू, असं म्हणत या पोस्ट्स व्हायरल केल्या जात आहेत.

तर पुण्यातल्या खंडोजी बाबा चौकामध्ये भाजपा आक्रमक झालेली पाहायला मिळाली. या ठिकाणी अजित पवारांविरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू आहे. त्यांचे पोस्टर्स हातात घेऊन भाजपा कार्यकर्ते जमले आहेत.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *