पुणे : चालत्या गाडीतून चालकाला फेकून चोरटे कारसह पसार

पुणे : चालकाला चालत्या कारमधून फेकून चोरट्यांनी ती कार पळवून नेल्याची धक्कादायक घटना पुणे-नगर रस्त्यावरील खराडी बायपास चौकात घडली. या प्रकरणी विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भात संतोष नाना पवार (वय ३६, रा. भिंगार बस स्टँडजवळ, नगर) यांनी विमानतळ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी नगर येथून प्रवाशांना घेऊन पुण्याला आले होते. पुन्हा परत नगरला जाताना रस्त्याच्या कडेला गाडी थांबवून ते प्रवाशांची वाट पाहत होते. त्यावेळी अनोळखी तिघेजण कार चालकाजवळ आले. त्यांनी ‘भाऊ मयत झाला असून, आम्हाला लातूरला घेऊन चल,’असे सांगितले.

त्यावर कारचालक संतोष यांनी ‘मी खूप थकलोय, घरी निघालो आहे. मी कोठेही येणार नाही,’असे सांगितले. चालकाने नकार दिल्यामुळे तिघांनी त्याला बेदम मारहाण केली. डोक्यात सिमेंटचा ब्लॉक मारुन जखमी केले. तसेच, मोबाईल आणि तीन हजारांची रोकड काढून घेतली. काही अंतरावर गेल्यानंतर फिर्यादीला चालत्या गाडीतून फेकून दिले. त्यानंतर कार घेऊन चोरटे पसार झाले.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *