पुणे – घरगुती व व्यावसायिक सिलेंडरमधून गॅस चोरी करणाऱ्या तिघांना अटक

 

पुणे - घरगुती व व्यावसायिक सिलेंडरमधून (Cylinder) अवैधपणे दुसऱ्या सिलेंडरमध्ये चोरुन गॅस (Gas) भरुन त्याची बाजारामध्ये विक्री (Selling) करणाऱ्या तिघांना गुन्हे शाखेच्या युनीट दोनच्या पथकाने अटक (Arrested) केली. पोलिसांनी त्यांच्याकडून भरलेले व रिकामे सिलेंडर जप्त करीत गॅस चोरी करणारे रॅकेट उघडकीस आणले.

जयकिसन मियाराम बिष्णोई (वय 27), जगदिश नारायणराम बिष्णोई (वय 27) व जगदिश नारायण बिश्नोई (वय 27, तिघेही रा. उरूळी देवाची, मुळ रा. जोधपुर, राजस्थान) अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत अवैधरित्या घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरमधून गॅस चोरी करून लहान सिलेंडरमध्ये भरताना लागलेल्या आगीमध्ये 22 सिलेंडरचा स्फोट झाला होता. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी काही जणांना अटक केली होती. या पार्श्‍वभुमीवर पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी गॅसचा काळाबाजार करणाऱ्यांवर कडक कारवाई करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, गुन्हे शाखेच्या पथकांकडून गॅस चोरी करणाऱ्यांचा शोध घेतला जात होता. दरम्यान, उरुळी कांचन परिसरात काही जण घरगुती व व्यावसायिक गॅस सिलेंडरमधून गॅसची चोरी करुन ते अन्य सिलेंडरमध्ये भरून त्याची बाजारात विक्री करीत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या युनीट दोनच्या पथकास मिळाली होती.

उरूळी देवाची येथील वज्रेश्‍वरी देवी मंदिराच्या मागील बाजुच्या परिसरातील एका गोदामामध्ये संशयित आरोपी नळीद्वारे अवैधपणे गॅस सिलिंडरची विक्री करीत असल्याची खबलर पोलिसांना प्राप्त झाली. त्यानुसार, पोलिसांनी संबंधित ठिकाणी पाहणी केली, त्यावेळी तेथील एका बंगल्यामध्ये तिघेजण संशयास्पदरीत्या फिरत असल्याचे पोलिसांच्या निर्दनास आले. त्यानुसार पोलिसांनी गुरुवारी सकाळी साडे सात वाजण्याच्या सुमारास तेथे छापा टाकून तिघांना अटक केली. तिघेजण एका घरोघरी सिलेंडर पोचविण्याचे काम करतात.

त्यांच्याकडून एकूण 31 गॅस सिलेंडर जप्त करण्यात आले. यावेळी तिघांकडून 19 किलोचे 31 गॅस सिलेंडर, भारत कंपनीचे 26, एचपी कंपनीचे 5 गॅस सिलेंडर, 5 किलोचा एक रिकामा सिलेंडर असा 53 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याबरोबरच वायगंडे यांच्या घरासमोरील मोकळ्या जागेतील बंद पडलेल्या तीन चाकी टेम्पोमध्ये सहा रिकामे सिलिंडर सापडले.

याप्रकरणी पोलिसांनी तहसील कार्यालयास माहिती कळवून आरोपींनी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यांना नऊ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. सहाय्यक पोलिस आयुक्त गजानन टोम्पे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील, पोलिस उपनिरीक्षक संजय गायकवाड, सहायक पोलिस उपनिरीक्षक यशवंत आंब्रे, पोलिस कर्मचारी अस्लम पठाण, संजय जाधव यांच्या पथकाने हि कारवाई केली.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply