पुणे : गुंगीचे ओैषध देऊन तरुणीवर सामूहिक बलात्कार या प्रकरणी पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे.

पुणे : तरुणीच्या चेहऱ्यावर गुंगीच्या ओैषधाचा फवारा (स्प्रे) मारुन तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी कोंढवा पाेलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. राकेश सतीश आढाव (वय ३२, रा. विमाननगर ), मोहम्मद शहानवाजउद्दीन सर्फउद्दीन, मोहम्मद शरीफनवाज सर्फउद्दीन (दोघे रा. ओैरंगाबाद) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत पीडित तरुणीने काेंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पीडित तरुणी एका सोसायटीत राहायला आहे. गेल्या रविवारी (९ ऑक्टोबर) तरुणीच्या मैत्रिणीने पार्टीचे आयोजन केले होते. मैत्रिणीने तिचे मित्र राकेश, मोहम्मद यांना सदनिकेत पार्टीसाठी बोलावले होते. पार्टी सायंकाळी होती. तरुणी दुसऱ्या खोलीत दुपारी तीनच्या सुमारास आराम करण्यासाठी गेली. तेव्हा आरोपींनी झोपेत असलेल्या तरुणीच्या चेहऱ्यावर गुंगी येणाऱ्या ओैषधाचा फवारा मारुन तिच्यावर बलात्कार केला.

दोन तासानंतर तरुणी शुद्धीवर आली. तेव्हा आरोपींनी तिच्यावर बलात्कार केल्याचे उघडकीस आले. पीडित तरुणीने तक्रार दिल्यानंतर या प्रकरणात गुन्हा दाखल करुन आरोपींना अटक करण्यात आली. पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सरदार पाटील तपास करत आहेत.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *