पुणे : गज्या मारणे टोळीतील आणखी एक गुंड अटकेत ; शेअर दलाल अपहरण प्रकरणी आतापर्यंत सहाजण अटक , मारणेचा शोध सुरू

पुणे : शेअर दलालाचे २० कोटींच्या खंडणीसाठी अपहरण केल्याप्रकरणी गुंड गज्या मारणे टोळीतील सराईतास गुन्हे शाखेने पकडले. सिंहगड रस्ता परिसरात ही कारवाई करण्यात आली.मयूर राजेंद्र निवंगुणे (वय २४ रा. वसंत प्लाझा, नऱ्हे) असे अटक केलेल्या सराईताचे नाव आहे. शेअर दलालाच्या अपहरण प्रकरणात आतापर्यंत सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे. मारणे टोळीचा म्होरक्या गजानन उर्फ गज्या मारणेचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

शेअर दलालाचे अपहरण करुन वीस कोटींची खंडणी मागितल्या प्रकरणी दाखल गुन्ह्यात पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी गज्या मारणेसह साथीदारांच्या विरोधात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

खंडणी प्रकरणातील आरोपी निवंगुणे सिंहगड रस्ता परिसरातील नवले पुलाजवळ येणार असल्याची माहिती दरोडा आणि वाहन चोरी विरोधी पथकातील पोलीस कर्मचारी सुमित ताकपेरे यांना मिळाली. त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कदम, सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र पाटील, सहायक फौजदार शाहीद शेख, हवालदार निलेश शिवतरे, सुमित ताकपेरे, श्रीकांत दगडे, ऋषिकेश कोळपे आदींनी सापळा लावून निवंगुणेला पकडले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply