पुणे : खुनाचा बदला घेण्यासाठी टोळक्याचा तरुणावर प्राणघातक हल्ला; हडपसर भागातील घटना

पुणे : दोन वर्षांपूर्वी झालेल्या गुंडाच्या खुनाचा बदला घेण्यासाठी टोळक्याने तरुणावर कोयत्याने वार केल्याची घटना हडपसर भागात घडली. याप्रकरणी आकाश मोहन कांबळे, नुण्या शेख, राहुल पुटगे तसेच साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी सराइत गुन्हेगार असून पोलिसांनी राहुल पुटगे याला अटक केली आहे. श्रीकांत जगन्नाथ गायकवाड (वय ३२, रा. अष्टविनायक कॉलनी, गंगानगर, फुरसुंगी) याने या संदर्भात हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. २६ मे २०२० रोजी बसवराज जयभीम कांबळे (वय २८, रा. अष्टविनायक कॉलनी, गंगानगर, फुरसुंगी, मूळ रा. कर्नाटक) याचा वैमनस्यातून अमोल शिंदे आणि साथीदारांनी खून केला होता. तक्रारदार श्रीकांत गायकवाड यााचा स्लायडिंग खिडकी तयार करण्याचा व्यवसाय आहे.

बसवराजच्या खून प्रकरणात गायकवाडचा हात असल्याचा संशय आरोपींना होता. आरोपींनी दुचाकीस्वार गायकवाडला अडवले. त्याच्या डोक्यावर कोयत्याने वार केला. त्या वेळी भांडणे सोडविण्यासाठी आलेल्या नागरिकांना शस्त्राचा धाक दाखवून आरोपींनी दहशत माजविली. गंभीर जखमी झालेल्या गायकवाड याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून पोलीस उपनिरीक्षक ढावरे तपास करत आहेत.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply