पुणे : खडकवासला धरण १०० टक्के भरले, धरणातून ११९०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू ; नदी काठच्या नागरिकांनी सतर्क राहावे

पुणे : पुणे शहराला पाणी पुरवठा करणार्‍या चार ही धरणात पावसाने दमदार हजेरी लावली असून खडकवासला धरण १०० टक्के भरले आहे. त्या पार्श्वभूमीवर आज दुपारी एक वाजल्यापासून धरणाच्या सांडव्यातून ११ हजार ९०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सोडण्यात येत आहे.त्यामुळे नदी काठच्या भागात राहणाऱ्या नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन जिल्हा प्रशासना मार्फत करण्यात आले आहे.

पुणे शहर आणि आसपासच्या परिसरात संततधार पाऊस सुरू आहे.यामुळे पुणे शहराला पाणी पुरवठा करणार्‍या पानशेत, टेमघर,वरसगाव आणि खडकवासला या चारही धरणामधील पाणीसाठ्यात चांगलीच वाढ होत आहे. सध्या धरणात जोरदार पाऊस सुरू असून चार ही धरणात मिळून १०.२९ टीएमसी, ३७.०१ टक्के इतका पाणीसाठा उपलब्ध आहे. तर धरण क्षेत्रात जोरदार पाऊस असल्याने रात्री १२ वाजल्यापासून खडकवासला धरणाच्या सांडव्यातून ८५६ क्युसेक पाण्याचा विसर्ग सोडण्यास सुरुवात केली. त्यामध्ये टप्प्या टप्प्याने वाढ करीत,आता दुपारी एक वाजण्याच्या सुमारास ११९०० क्युसेक पाणी सोडण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे नदी काठच्या भागात राहणाऱ्या नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन जिल्हा प्रशासना मार्फत करण्यात आले आहे.

खालील आकडेवारी आज सकाळी ७ वाजेपर्यंतची

 धरण                  टीएमसी         टक्केवारी

टेमघर                   ०.६८               १८.२९%

वरसगाव                ४.३०               ३३.५८%

पानशेत                  ३.८१               ३५.८२%

खडकवासला          १.८६               ९४.०८%

नदी पात्रातील जलपर्णी महापालिकेच्या कर्मचार्‍यांनी काढलीच नाही खडकवासला धरण १०० टक्के भरले असल्याने,नदी पात्रात पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे.त्यामुळे नदी पात्रात असलेली जलपर्णी आज सकाळी बाबा भिडे पुला जवळ येऊन मोठ्या प्रमाणावर अडकली.यामुळे पाणी जाण्यास मार्ग नव्हता.त्या बाबत महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाला मिळाल्यावर,काही वेळाने, जलपर्णी काढण्यास महापालिकेचा जेसीबी घटनास्थळी आला. पण त्या कर्मचार्‍यांनी जलपर्णी न काढता,केवळ नदीपात्रातून पाण्याला मार्ग काढून दिला आणि जलपर्णी पुढे वाहून जावू लागली.यामुळे यातून महापालिकेचा ढिसाळ कारभार दिसून येत आहे.आता हीच जलपर्णी पुढील एखाद्या पुलास जाऊन अडकण्याची शक्यता आहे.आता यावर महापालिका कशा प्रकारे काम करते,हे दिसून येते.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply