पुणे : खडकवासला धरणसाखळी प्रकल्पातील पाणीसाठा २१ टक्क्यांवर; धरणक्षेत्रांत दमदार पाऊस कायम

पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणसाखळी प्रकल्पात सुरू असलेला दमदार पाऊस  कायम आहे. त्यामुळे खडकवासला धरणसाखळी प्रकल्पातील पाणीसाठा २१ टक्क्यांवर पोहोचला आहे.

शुक्रवारी रात्रीपासून शनिवारी सकाळपर्यंत चारही धरणांच्या परिसरात मुसळधार पाऊस झाला. शुक्रवारी रात्रीपासून शनिवारी सकाळपर्यंत टेमघर धरण क्षेत्रात ९० मिलिमीटर, वरसगाव धरण परिसरात ७१ मि.मी, पानशेत धरण परिसरात ८० मि.मी, तर खडकवासला धरण क्षेत्रात आठ मि.मी पावसाची नोंद झाली आहे.

सध्या खडकवासला धरणसाखळी प्रकल्पात ६.२० अब्ज घनफूट (टीएमसी) म्हणजेच २१.२९ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. शुक्रवारी रात्री चारही धरणांत ५.७१ टीएमसी पाणीसाठा होता. शुक्रवारी रात्रीच्या तुलनेत शनिवारी सकाळी ०.४९ टीएमसीने पाणीसाठ्यात वाढ झाली आहे, असे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply