पुणे : कौटुंबिक वादातून जावयाने केला सासर्‍याचा खून, घटनेनंतर जावई पोलिस ठाण्यात हजर

पुणे : कौटुंबिक वादाच्या कारणातून जावयाने सासर्‍यावर चाकूने वार करून त्यांचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी सायंकाळी साडे सात वाजता उघड़कीस आला. या घटनेनंतर जावयाने हातात चाकू घेऊन पोलिस ठाणे गाठत खडकी पोलिसांना स्वत:च खुनाची कबूली दिली. रमेश रामचंद्र उत्तरकर (वय.65,रा. आकाशदिप सोसायटी खडकी) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर अशोक गुलाब कुडले (वय.38,रा. खडकी बाजार) असे अटक केलेल्या व्यक्तिचे नाव आहे. ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुडले हा उतरकर यांचा जावई आहे. 2019 पासून कुडले व त्याच्या पत्नीमध्ये कौटुंबिक कारणातून वाद सुरू होते. तेव्हापासून पती-पत्नी वेगळे राहत आहेत. कुडले त्याच्या आईसोबत, तर त्याची पत्नी वडिलांकडे राहते. दोघांना एक मुलगा व एक मुलगी अशी दोन मुले आहेत. तर उत्तरकर यांची दोन दुकाने असून त्यांनी दोन्ही दुकाने भाड्याने दिली आहेत. तर कुडले हा वडापावची गाडी चालवतो. दरम्यान, त्यांच्यातील कौटुंबिक वाद न्यायप्रविष्ठ आहे. कुडले हा उत्तरकर यांना पत्नीला नांदायला पाठवा असे सातत्याने सांगत होता. तर उत्तरकर हे घटस्फोट घेण्याबाबत आग्रही होते. याच प्रकरणाबाबत बुधवारी न्यायलयात तारीख होती. न्यायालयात तारखेला हजर राहिल्यानंतर कुडले व उत्तरकर यांच्यात वाद झाले.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *