पुणे : कोरेगाव पार्क परिसरात बेकायदा हुक्का पार्लरवर कारवाई

पुणे : कोरेगाव पार्क परिसरात हाॅटेलमधील बेकायदा हुक्का पार्लरवर पोलिसांनी छापा टाकला. पोलिसांनी हुक्का पार्लर चालकासह तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. या कारवाईत हुक्का पात्र, सुगंधी तंबाखू असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.या प्रकरणी नरेंद्र अक्षयकुमार चौधरी (वय २०) शामल मनोरंजन देवनाथ (वय ३१), कुमार अमर प्रधान (दोघे रा. रागविलास सोसायटी, नाॅर्थ मेन रोड, कोरेगाव पार्क) यांच्या विराेधात गु्न्हा दाखल करण्यात आला. मुंबईतील कमला मिल येथे झालेल्या दुर्घटनेनंतर राज्य सरकारने हुक्का पार्लरवर बंदी घातली आहे. कोरेगाव पार्कमधील डार्क हाॅर्स हाॅटेलमध्ये बेकायदा हुक्का पार्लर सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने डार्क हाॅर्स हाॅटेलमधील हुक्का पार्लर चालक नरेंद्र चौधरी याला ताब्यात घेऊन कारवाई केली.

कोरेगाव पार्क परिसरातील गल्ली क्रमांक सात येथे डेझर्ट वाॅटर हाॅटेलमध्ये हुक्का पार्लर सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तेथे कारवाई केली. पोलिसांनी हुक्का पार्लर चालक शामल देवनाथ, कुमार प्रधान यांच्या विरोधात गु्न्हा दाखल केला. पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक वेताळ, सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रय लिंगाडे, सावंत, संदीप जडर, विवेक जाधव, प्रवीण पडवळ, वर्षा ॲथोंनी आदींनी ही कारवाई केली.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *