पुणे : कोरेगाव पार्क परिसरात अतिक्रमण कारवाई; पाच ट्रक साहित्य जप्त

मुंढवा : पुणे महानगरपालिकेच्या अतिक्रमण, परवाना व आकाशचिन्ह व अनधिकृत बांधकाम निर्मूलन विभाग यांची संयुक्त कारवाई, ढोले पाटील क्षेत्रिय कार्यालयाच्या कोरेगाव पार्क परिसरातील करण्यात आली. या कारवाईत ७१०० चौरस फूट फ्रंट मार्जींग साईड मार्जींग पत्राचे शेड, कच्चे व पक्के बांधकाम काढण्यात येवून पाच ट्रक माल जप्त करण्यात आला.

कोरेगाव पार्क येथील नॉर्थ मेन रोड, कोरेगाव पार्क लेन नंबर ३ , ६ , ७, जर्मन बेकरी, साऊथ मेन रोड, गाडगे महाराज वस्ती लगत सकाळी दहा वनाजल्यापासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत कारवाई सुरू होती. या कारवाईत क्षेत्रिय अतिक्रमण निरीक्षक सुभाष तळेकर, अतिक्रमण निरीक्षक राजेंद्र लोंढे, सुभाष जगताप, अनिल परदेशी, आकाशचिन्ह परवाना निरीक्षक अनिल मारकड, बांधकाम विभागाचे अभियंता गोपाळ भंडारी व नितीन चांदणे इतर अधिकारी यांच्या उपस्थितीत कारवाई करण्यात आली.या कारवाईत सहा ट्रक व वाहने, दोन जे सी बी, तीस सेवक, घरपाडी आठ सेवक व पाच पोलिस यांचा सहभाग होता.

रस्ता, फुटपाथ, साईड व फ्रन्ट मार्जींग व रस्ता पदपाथवर आलेले शेड, बेवारस वाहने, विविध प्रकारच्या वस्तू असे पाच ट्रक साहित्य खराडी गोडावूनला जमा करण्यात आले. यापुढे सातत्याने अशी मोहीम ढोले पाटील क्षेत्रीय कार्यालयाच्या संपुर्ण हद्दीत राबविली जाईल, अशी माहिती अतिक्रमण निरिक्षक लोंढे यांनी दिली.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply