पुणे : कोयता घेऊन दहशत माजवणाऱ्या ५ जणांना अटक

पुणे : कोयता घेऊन दहशत माजवणाऱ्या ५ जणांना पोलिसांनीअटक केली आहे. पुण्यातील समर्थ पोलिस ठाण्याच्या हद्दीत ५ जणांच्या मुसक्या आवळल्या.या ५ जणांपैकी काही आरोपी हे रेकॉर्ड वरचे आहेत. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एक जानेवारी रोजी काही तरुणांची आपापसात किरकोळ कारणावरून भांडण झाले. या भांडणाचा मनात राग ठेऊन या आरोपींनी नवा वाडा या ठिकाणी जाऊन हातात कोयते घेऊन दहशत माजवण्याचा प्रयत्न केला.

त्यानंतर सीसीटीव्ही फुटेज पाहण्यात आले. सीसीटीव्हीच्या साह्याने पोलिसांनी या पाच जणांना अटक केली आहे. गगन मिशन (१९), अमन खान (२२), अर्सालान तांबोळी (२७), मंगेश चव्हाण (२४), गणेश पवार (२४) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.गेल्या अनेक दिवसांपासून पुण्यात अनेक तरुण हातात कोयता घेऊन सर्रास दहशत घडवत आहेत. गेल्या काही शहरातील अनेक मध्यवर्ती तसेच उपनगर भागात अनेक तरुण कोयता घेऊन फिरत असल्याचे अनेक व्हिडिओ समोर आले आहेत



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *