पुणे : कोथरूड पोलिसांकडून एक लाखांचे मॅफेड्रॉन जप्त

पुणे : कोथरूड भागात अंमली पदार्थ विक्री करण्याकरिता आलेल्या दोघांना कोथरूड पोलिसांच्या पथकाने अटक केली. त्यांच्याकडून १ लाख १ हजार रुपयाचे ६ ग्रॅम ७५० मिली मेफेड्रोन पावडर जप्त करण्यात आली आहे.रवि मोहनिंसग राठोड उर्फ बिल्ला ( वय ३६, रा. भूगाव, मूळगाव राजस्थान), आदित्य संदीप माण ( रा. बावधन, मूळगाव नाशिक) अशी अटक करण्यात आलेल्याची नावे आहेत.

शहरात अंमली पदार्थ तस्करीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून गस्त वाढविण्यात आली आहे. यानुसार कोथरूड पोलिसांचे पथक हद्दीत गस्तीवर होते. या दरम्यान हिल व्ह्यू सोसायटी भागात दोघेजण मेफेड्रॉन पावडर विकण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलीस कर्मचारी अजिनाथ चौधर, संजय दहिभाते यांना मिळाली होती.

त्यानुसार पथकाने सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे ६ ग्रॅम मेफेड्रॉन आढळून आले. यानूसार दोघांना अटक करण्यात आली. सहायक आयुक्त रूक्मिणी गलांडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप, गुन्हे निरीक्षक बाळासाहेब बडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रवीण कुलकर्णी, अंमलदार योगेश सूळ, विष्णू राठोड, ,अजय शिर्वे, शरद राऊत, मंगेश शेळके, दादा भवर आदींनी ही कारवाई केली.

 



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply