पुणे :  कोंढव्यात फर्निचरच्या गोडाऊनला भीषण आग

पुणे : कोंढवा बुद्रूक येथील पारगे नगरमधील एका फर्निचरच्या गोडाऊनला लागलेल्या भीषण आगीमध्ये संपुर्ण गोडाऊन आगीच्या भस्मस्थानी सापडले. हि घटना मंगळवारी दुपारी साडे चार वाजण्याच्या सुमारास घडली. दरम्यान, अग्निशामक दलाच्या जवानांनी अडीच तासात आगीवर नियंत्रण मिळविले.

कोंढव्यातील पारगे नगर येथे फर्निचरचे मोठे गोडाऊन आहे. या गोडाऊनमधून मंगळवारी दुपारी सव्वा चार वाजण्याच्या सुमारास मोठ्या प्रमाणात धूर येत असल्याचे नागरीकांना दिसले. त्यामुळे नागरीकांनी याबाबत तत्काळ अग्निशामक दलास याबाबत खबर दिली. काही वेळातच दाखल झालेल्या अग्निशामक दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळविण्यास सुरूवात केली.

मात्र या गोडाऊनमध्ये फर्निचरच्या वस्तु मोठ्या प्रमाणात असल्याने आग काही वेळातच वाढली. त्यामुळे जवानांनी आगीवर पाण्याचा जोरदार मारा करुन त्यावर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. दोन ते अडीच तासानंतर जवानांना आगीवर नियंत्रण मिळविता आले. रात्री उशीरापर्यंत जवानांकडून कुलींगचे काम सुरु होते. या आगीमध्ये संपुर्ण गोडाऊन जळून खाक झाले. दरम्यान, गोडाऊनला आग कशामुळे लागली, याबाबतचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply