पुणे : कामावरून काढल्याचा राग, पेट्रोल ओतून मालकिणीला पेटवलं; आरोपीही होरपळला

पुणे : पुण्यातील वडगाव शेरी परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. कामावरून काढून टाकल्याच्या राग मनात धरत नोकराने आपल्याच मालकिणीला पेट्रोल टाकून पेटवून दिलं आहे. या भयंकर घटनेत स्वत: नोकरही जळाला असून त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. तर, मालकिणीचाही रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. सोमवारी (२५ एप्रिल) रात्री ११:३० वाजेच्या सुमारास ही घटना घडली.

मिलिंद गोविंदराव नाथसागर (वय ३५, रा. पोलिस कॉलनी, वडगाव शेरी) असे मृत पावलेल्या आरोपी नोकराचं नाव आहे. तर बाला नोया जोनिंग (वय 32, रा.पोलिस लाईन, मांदळे निवास, वडगाव शेरी) असे मृत्युमुखी पडलेल्या दुकान मालकिणीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जॉनिंग या मुळ आसाम येथील असून त्यांचे वडगाव शेरी येथील रामचंद्र सभागृहाजवळ 'ए टु झेड टेलरिंग' नावाचे महिलांची कपडे शिवण्याचे दुकान आहे.

आरोपी मिलिंद हा जॉनिंग यांच्याकडे ४ महिन्यापासून कामाला होता. गेल्या काही दिवसांपासून तो व्यवस्थित काम करत नसल्याने त्याला जॉनिंग यांनी कामावरुन काढून टाकले होते. दरम्यान, सोमवारी रात्री ११:३० वाजेच्या सुमारास आरोपी मिलिंद हा जॉनिंग यांच्या दुकानात आला. त्यावेळी त्याने मला कामावरून का काढले, असा जाब विचारत जॉनिंग यांच्यासोबत वाद घातला. हा वाद इतका विकोपाला गेला की, आरोपीने बाटलीत आणलेले पेट्रोल जॉनिंग यांच्या अंगावर ओतले आणि सिगारेटच्या लायटरने आग लावली. यावेळी जॉनिंग यांनी आरोपी मिलिंदला पकडून ठेवलं. त्यामुळे नाथसागर व जॉनिंग हे दोघेही गंभीररित्या भाजले.

दरम्यान, हा सर्व प्रकार लक्षात येताच बाहेर उभा असलेला आरोपीचा मित्र प्रशांतकुमार देबनार दुकानात आला. यावेळी, आग विझवण्याच्या नांदात तोही जखमी झाला. त्यानंतर परिसरातील नागरिकांनी आग विझवत तिघांनाही रुग्णालयात दाखल केलं. मात्र, रुग्णालयात जाण्यापूर्वीच आरोपी मिलिंदचा मृत्यू झाला होता. दुसरीकडे जॉनिंग यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांचा देखील मंगळवारी सकाळी मृत्यू झाला. या थरारक घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक स्वप्निल गायकवाड़ करीत आहेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply