उंड्री: कात्रज बायपास रस्त्यावर उंड्री ते हांडेवाडी चौक दरम्यानच्या डोंगरावर विद्युत खांबामुळे अरुंद रस्ता वाहनचालकांसाठी मृत्यूचा सापळा बनला आहे. महापालिकेच्या रस्ते विभागाने रस्तारुंदीकरणाला अडथळा ठरणारे विद्युत खांब तातडीने हटवावे, रस्ता रुंद करून वाहनचालकांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांसह वाहनचालकांनी केली आहे.
स्कूल बसचालक शंकर मिसेकर म्हणाले की, उंड्रीमध्ये एक किलोमीटर परिघामध्ये सुमारे दहा खासगी इंग्रजी माध्यमाच्या शाळा आहेत. त्यामुळे पीएमबी बसेससह खासगी वाहने आणि स्कूल बसेसची वर्दळ वाढली आहे. कात्रज बायपास मंतरवाडी ते खडीमशीन चौक दरम्यानच्या रस्त्यावर डोंगरावर विद्युत खांब असल्यामुळे रस्ते विभागाने रस्ता रुंद न करता तसाच सोडून दिला आहे. त्यामुळे येथून एका वेळी एकच वाहन जाते, मोठे वाहन असेल तर वाहन चालविताना कसरत करावी लागते. अनेक विद्युत खांब वाहनचालकांसाठी धोकादायक आहेत. गावच्या ठिकाणच्या ओढ्यावर चढ-उतार आणि एकदम वळण अशी स्थिती रस्त्याची आहे. त्यामुळे डोळ्यात तेल घालून वाहन चालवावे लागत आहे, असे त्यांनी सांगितले.
रात्री-अपरात्री समोरून येणाऱ्या वाहनांचे प्रखर प्रकाश दिव्यांमुळे डोळे दीपतात आणि वाहन डोंगराला नाही तर दुभाजकाला घासून अपघात होऊन वाहनाचे नुकसान होते. रस्ता रुंदीकरण रखडल्यामुळे वाहनचालकांची फसगत होत आहे. रात्रीच्या वेळी वाहनचालवताना मृत्यू डोळ्यासमोर दिसतो, असे टेम्पोचालक सचिन कदम यांनी सांगितले.
रस्ता रुंदीकरण विद्युत विभागाच्या हटवादीपणामुळे रखडले आहे. या रस्त्याच्या रुंदीकरणासाठी सर्व पक्षीय कार्यकर्त्यांनी वारंवार पाठपुरावा केला, रस्ता रोको केले, आंदोलने केल्यानंतर रस्ता झाला. विद्युत विभागाकडे वारंवार नोटीस देऊनही अद्याप त्यावर कार्यवाही केली गेली नाही.
शहर
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- प्रवाशांना दिलासा: नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढला, प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
महाराष्ट्र
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- इराण-इस्रायल संघर्षात मुंबईच्या खलाशाचा बळी; सोळंकी कुटुंबावर महिन्याभरात दुसरे दुःख
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले
- त्वचेला नैसर्गिक चमक हवी? बीटच्या साध्या उपायांनी मिळवा गुलाबी आणि निरोगी कांती!
- सूर्यप्रकाशापासून त्वचेचे संरक्षण: सनस्क्रीन वापरताना या महत्त्वाच्या चुका टाळा!
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
देश विदेश
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी



























Subscribe to my channel


