पुणे : कात्रजमध्ये जळालेल्या अवस्थेत आढळला मृतदेह; परिसरात खळबळ

पुणे : शहरातील कात्रज परिसरात तरूणाचा जळालेल्या अवस्थेत तुरुणाचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, मृतदेह जळाला असल्याने त्याची ओळख अद्याप पटू शकलेली नाही. मात्र, गाडीच्या नंबर प्लेटवरु संबंधित तरूण वानवडी भागात वास्तव्यास असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, पुण्यातील कात्रज दरीत एका तरुणाचा मृतदेह असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या जवानांनीधाव घेत संबंधित तरुणाचा मृददेह दरीतून बाहेर काढला. मात्र, तरुणाचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत असल्याने त्याची ओळख अद्याप पटू शकलेली नसून, त्याच्या गाडीच्या नंबर वरून हा तरूण पुण्यातील वानवडी  भागात वास्तव्यास असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

संबंधित तरूण रागाच्या भरात घरातून दोन दिवसांपूर्वी बाहेर पडला होता अशी देखील माहिती समोर आली असून, हा घातपात आहे का? अपघात याचा तपास पोलीस करत आहेत.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *