पुणे : कल्याणीनगर भागात चोरट्यांचा धुमाकूळ,दोन सदनिका फोडल्या; साडेचार लाखांचा ऐवज लांबविला

पुणे : कल्याणीनगर भागात चोरट्यांनी दोन सदनिकांचे कुलुप तोडून कपाटातील साडेचार लाख रुपयांचे दागिने लांबविल्याची घटना उघडकीस आली.याबाबत गौरव चमोली (वय ३७, रा. कारर्नेशन सोसायटी, कल्याणीनगर, येरवडा) यांनी येरवडा पोलीस ठाण्यत फिर्याद दिली आहे. चमोले यांच्या सदनिकेचे कुलुप तोडून चोरट्यांनी कपाटातील रोकड आणि सोन्याचे दागिने असा दाेन लाख ८० हजार रुपयांचा ऐवज लांबविला.

कारर्नेशन सोसायटीतील रहिवासी थोंकुर चौटा (वय ७७) यांच्या सदनिकेचे कुलुप तोडून चोरट्यांनी कपाटातील दागिने, रोकड असा एक लाख ६० हजार रुपयांचा ऐवज लांबविला.एकाच सोसायटीतील दोन सदनिका फोडण्यात आल्याचे उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. सोसायटीच्या आवारातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेले चित्रीकरण पोलिसांनी ताब्यात घेतले असून पोलीस उपनिरीक्षक डोंबाळ तपास करत आहेत.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *