पुणे : उधारीवर दारू न दिल्याने मद्यालयाच्या मालकावर हल्ला ; सिंहगड रस्ता भागातील घटना; सराईत गुन्हेगारासह साथीदार फरार

पुणे : उधारीवर दारू न दिल्याने सराईत गुन्हेगार आणि त्याच्या साथीदारांनी मद्यालयाच्या मालकावर हल्ला करुन तोडफोड केल्याची घटना सिंहगड रस्ता भागात घडली. आराेपींंनी मद्यालयाची तोडफोड करुन ग्राहकांना शिवीगाळ केली. ग्राहकांना कोयत्याचा धाक दाखवून दहशत माजविली.

या प्रकरणी श्रीकांत थोपटे (वय ३५) याच्यासह पाच ते सहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. थोपटे हा सराईत गुन्हेगार आहे. याबाबत गुरुण्णा शिवण्णा तावरखेड (वय ४०, रा. मुक्तांगण सोसायटी, नऱ्हे) यांनी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तावरखेड यांचे नऱ्हे भागात लक्ष्मी बार अँड रेस्टाॅरंट आहे. आरोपी थोपटे आणि साथीदार मोटारीतून आले. तावरखेड यांच्याकडे उधारीवर दारू मागितली. त्यांनी उधारीवर दारू देण्यास नकार दिला. आरोपी थोपटेने तावरखेड यांच्या डोक्यात कोयता मारला. थोपटे आणि साथीदारांनी मद्यालयात दहशत माजवून ग्राहकांना शिवीगाळ केले.

नऱ्हे परिसरातील दुकानदारांना धमकावून दुकाने बंद करण्यास सांगितले. आरोपी मोटारीतून पसार झाले. पसार झालेल्या आरोपींचा शोध घेण्यात येत असून सहायक पोलीस निरीक्षक यादव तपास करत आहेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply