पुणे : अवघ्या ३० सेकंदात मंदिरातील दानपेटी घेऊन चोरटे पसार, तळेगाव दाभाडे येथील घटना

पुणे : पुण्याच्या तळेगाव दाभाडे येथे दुर्गामाता मंदिरात अज्ञात दोन चोरट्यांनी दानपेटी पळवली. चोरट्यांनी काही अंतरावर जाऊन दानपेटी फोडून त्यातील पैसे घेऊन पोबारा केला. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. तळेगाव दाभाडे पोलीस अधिक तपास करत आहेत. ही घटना दोन दिवसांपूर्वी पहाटेच्या सुमारास घडली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तळेगाव दाभाडे येथे दुर्गा मंदिर असून पहाटेच्या सुमारास चोरट्यांनी मंदिरात प्रवेश केला. मंदिरात आणि परिसरात कोणीही नसल्याची खात्री केली. अवघ्या तीस सेकंदात अज्ञात दोघांनी मंदिरातील दान पेटी पळवून काही अंतरावर ती फोडली आणि त्यातील पैसे घेऊन पसार झाले. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला असून तळेगाव दाभाडे पोलीस अधिक तपास करत आहेत. दानपेटीत किती पैसे होते हे अद्याप समजू शकले नाही. मंदिरात चोरी झाल्याने सर्वसामान्य नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *