पुणे : अमली पदार्थ विक्री प्रकरणात परदेशी नागरिक गजाआड; सात लाखांचे मेफेड्रोन जप्त

पुण्यातील वानवडी परिसरात अमली पदार्थ विरोधी पथकाने कारवाई केली आहे. या कारवाईत एका नायझेरियन तरुणाला अटक करण्यात आली आहे. एरिक सिरील चेनेडू (वय २४, सध्या रा. मोरया हाईट्स, हांडेवाडी, हडपसर, मूळ रा. नायजेरिया) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. त्याच्याकडून पथकाने सात लाख १९ हजारांचे ५१ ग्रॅम मेफेड्रोन तसेच मोबाइल संच जप्त केला आहे.

वानवडी परिसरात परदेशी नागरिक अमली पदार्थ विक्रीसाठी येणार असल्याची माहिती अमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सापळा लावून त्याला पकडले. त्याची झडती घेण्यात आली, तेव्हा त्याच्याकडे असलेल्या छोट्या पिशवीत मेफेड्रोन (एमडी) आढळून आले. एरिककडून ५१ ग्रॅम मेफेड्रोन आणि मोबाइल संच असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

सहायक पोलीस आयुक्त नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनील थोपटे, उपनिरीक्षक दिगंबर चव्हाण, एस. डी. नरके, संतोष देशपांडे, प्रशांत बोमादंडी, मयूर सूर्यवंशी, चेतन गायकवाड, साहिल शेख, नितीन जगदाळे आदींनी ही कारवाई केली.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply