पुणे : अन्न आणि औषध प्रशासन विभागातील सहायक आयुक्तांना लाच घेताना पकडले

पुणे : लॅक्टोज विक्री परवान्यासाठी दहा हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी अन्न आणि औषध प्रशासन विभागातील (एफडीए) सहायक आयुक्तांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले.

या प्रकरणी अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त साहेब एकनाथराव देसाई यांना अटक करण्यात आली. तक्रारदार यांनी त्यांच्या कंपनीमार्फत लॅक्टोज विक्रीचा परवाना मिळवण्यासाठी अन्न आणि औषध प्रशासन विभागाकडे अर्ज केला होता. अर्ज मंजूर करून परवाना देण्यासाठी सहायक आयुक्त साहेब देसाई यांनी तक्रारदाराकडे दहा हजार रुपयांची मागणी केली होती. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा लावला. देसाई यांना तक्रारदाराकडून लाच घेताना ताब्यात घेण्यात आले. पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अतिरिक्त अधीक्षक सूरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. पोलीस निरीक्षक भारत साळुंके तपास करत आहेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply