पुणे : अनैतिक संबंधातून महिलेचा खून ; सातारा रस्त्यावरील लॅाजमधील घटना

पुणे : अनैतिक संबंधातून विवाहित महिलेचा खून करण्यात आल्याची घटना पुणे-सातारा रस्त्यावरील एका लॅाजमध्ये घडली. महिलेचा खून करुन पसार झालेल्या एकास भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली. करुणा राधाकिसन काटमोरे (वय २३, रा. कात्रज) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी सचिन राजू शिंदे (वय ३०, रा. वारजे) याला अटक करण्यात आली आहे. करुणा विवाहित असून तिला पाच वर्षांचा मुलगा आहे.

तिचा पती एका हॅाटेलमध्ये काम करतो. आरोपी सचिनशी तिची काही महिन्यांपूर्वी ओळख झाली होती. त्यानंतर त्यांच्यात अनैतिक संबंध निर्माण झाले होते. रविवारी (१० जुलै) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास दोघेजण पुणे-सातारा रस्त्यावरील शीतल लॅाजमध्ये आले होते. त्यानंतर करुणा आणि सचिन यांच्यात वाद झाले. त्याने करुणाच्या गळ्यावर चाकूने वार केले. त्यानंतर तो पसार झाला.

सोमवारी (११ जुलै) लॅाजमधील कामगार साफसफाई करण्यासाठी आला. तेव्हा करुणा मृतावस्थेत सापडली. त्याने या घटनेची माहिती भारती विद्यापीठ पोलिसांना दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर, पोलीस निरीक्षक संगीता यादव यांनी तातडीने तपास सुरू केला. तपास पथकातील पोलीस कर्मचाऱ्यांनी पसार झालेल्या सचिनला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने खून केल्याची कबुली दिली.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply