
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभेचा कार्यकाळ संपुष्टात येत आहे. त्यामुळे महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियमानुसार पुणे विद्यापीठाचे दहा नोंदणीकृत पदवीधर अधिसभेवर निवडून देण्यासाठी विद्यापीठाच्या नोंदणीकृत पदवीधरांनी नावनोंदणी आणि मतदार यादी तयार करण्यासाठी १५ जून ते १४ जुलै या कालावधीत विद्यापीठाच्या संकेतस्थळावर ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याचे आवाहन विद्यापीठाकडून परिपत्रकाद्वारे करण्यात आले आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत अधिसभा निवडणुकीसाठीची मोर्चेबांधणी सुरू होणार असल्याचे दिसून येत आहे.
विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांनी या संदर्भातील परिपत्रक प्रसिद्ध केले आहे. विद्यापीठाच्या अधिसभेचा कार्यकाळ ऑगस्टअखेर संपुष्टात येत आहे. या अधिकार मंडळावर शिक्षक, प्राचार्य, शिक्षणसंस्था, शिक्षकेतर कर्मचारी, तसेच पदवीधर गटातून दहा उमेदवार निवडून दिले जातात. त्यासाठी विद्यापीठाने नोंदणीकृत पदवीधरांकडून अर्ज मागवले आहेत. त्यात पदवीधर हा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा असावा. पुणे विद्यापीठाची स्थापना होण्यापूर्वी मुंबई विद्यापीठाचे पदवीधर असलेल्या व्यक्तीही नोंदणीकृत पदवीधर म्हणून पात्र राहतील. पदवी प्रमाणपत्र आणि निवासाचा पुरावा आवश्यक राहील, असे नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा नोंदणीकृत पदवीधर म्हणून नव्याने नाव नोंदवायचे असल्यास विद्यापीठाच्या election.unipune.ac.in या संकेतस्थळावर नोंदणी करणे आवश्यक आहे. या पूर्वीच नोंदणी केलेल्या पदवीधरांनी मतदार यादीत नावाचा समावेश करण्यासाठी या संकेतस्थळावर ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करणे आवश्यक आहे. अर्ज करताना पदवी प्रमाणपत्र, निवासाचा पुरावा, नाव बदलले असल्यास शासकीय राजपत्राची अथवा विवाह नोंदणी प्रमाणपत्राची प्रत, छायाचित्र, सही स्कॅन करून अपलोड करणे आवश्यक असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
शहर
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
- Baramati : ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून व्हिडिओ कॉलवर वयोवृद्ध महिलेची 45 लाखांची लूट
- Pune : पुण्यात पुन्हा GBSचं संकट; 51 वर्षीय रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू, आरोग्य यंत्रणा अलर्ट
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
महाराष्ट्र
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
























Subscribe to my channel

