पुणे:न्यायालयाच्या आवारातच आरोपीला गांजा ; पोलीस बंदोबस्तात असताना प्रकार घडल्याने खळबळ

गुन्हेगाराला अटक करून शिवाजीनगर न्यायालयात हजर केल्यानंतर त्याच्या एका साथीदाराने त्याला न्यायालयाच्या परिसरातच गांजा पुरविल्याचा धक्कादायक प्रकार घडला. आरोपी पोलिसांच्या ताब्यात असतानाच हा प्रकार घडल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात मोक्कातील आरोपीसह त्याला गांजा पुरविणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मेहबूब जब्बार पठाण (२५, रा. स्वारगेट) याच्यासह साथीदारावर गुन्हा दाखल झाला आहे. पठाण याच्यावर स्वारगेट पोलीस ठाण्यात मोक्काचा गुन्हा दाखल आहे.पठाणला शिवाजीनगर कोर्टात हजर करण्यात आले होते.न्यायालयाच्या आवारात पोलिसांचे कर्मचारी त्याच्यासोबत होते. याचवेळी कोर्टातील गर्दीचा मोका साधून पठाणच्या साथीदाराने त्याला गांजाची पुडी दिली. पोलिसांनी पठाणची झाडाझडती घेतल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. पठाणला देण्यात आलेल्या पुडीमध्ये एक ग्रॅम गांजा असल्याचे स्पष्ट झाले आहे.

मात्र, आरोपी पोलिसांच्या ताब्यात असताना त्याला गांजा पुरविण्यात आल्याचा प्रकार घडल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पठाण याच्यासह त्याला गांजा पुरविणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांनी दिली. पोलिसांकडून कोर्ट परिसरातील सीसीटीव्हींची तपासणी करून गांजा पुरविणाऱ्याचा शोध घेण्यात येत आहे. शिवाजीनगर पोलीस पुढील तपास करीत आहेत.

 



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *