पुढील काही तासांत पुण्यासह ‘या’ जिल्ह्यांना झोडपणार पाऊस, कशी असेल मुंबईतील स्थिती?

पुणे : मागील चार ते पाच दिवसांपासून महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढला आहे. ऐन गणपती विसर्जनाच्या दिवशी बहुतांशी ठिकाणी पावसानं हजेरी लावल्याने गणेशभक्तांची पुरती तारांबळ उडाली होती. काल पुणे शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस कोसळला आहे. यानंतर आज पुन्हा एकदा हवामान खात्याने राज्यात पावसाचा इशारा दिला आहे. पुढील दोन ते तीन तासांत पुण्यासह काही जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

भारतीय हवामानशास्त्र विभागाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ के एस होसाळीकर यांनी ट्वीट करत याबाबतची माहिती दिली आहे. पुढील काही तासांत पुण्यासह अहमदनगर, रत्नागिरी, बीड, सातारा, सिंधुदुर्ग, दक्षिण सोलापूर आणि ठाणे आदी ठिकाणी मेघगर्जनेसह मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. आज मुंबईत ढगाळ हवामानाची नोंद करण्यात आली असून तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे

रविवारी सायंकाळी पुण्यात ढगफुटीसदृश्य पाऊस कोसळला आहे. दोन तास कोसळलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणं जलमय झाली होती. अनेकांच्या घरात पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झालं होतं. पुण्यातील चंदननगर पोलीस ठाण्यातही गुडघाभर पाणी साचलं होतं. यानंतर आज पुन्हा एकदा पुण्यातील काही भागात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply