पिंपरी : माजी नगरसेवक प्रकाश मलशेट्टी यांचा ‘बाळासाहेबांची शिवसेना’ गटात प्रवेश

पिंपरी : काळेवाडीतील माजी नगरसेवक प्रकाश मलशेट्टी, उद्योजक दिलीप कुसाळकर यांच्यासह १०० हून अधिक कार्यकर्त्यांनी खासदार श्रीरंग बारणे यांच्या उपस्थितीत ‘बाळासाहेबांची शिवसेना’ गटात प्रवेश केला.

प्रकाश मलशेट्टी यांनी काळेवाडी परिसराचे पालिकेत प्रतिनिधित्व केले आहे. या भागात त्यांची राजकीय ताकद आहे. खासदार बारणे, पुणे जिल्हाप्रमुख बाळासाहेब वाल्हेकर, शहरप्रमुख निलेश तरस यांनी मलशेट्टी आणि अन्य कार्यकर्त्यांचे पक्षात स्वागत केले.

बारणे म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्याने प्रेरित होऊन कार्यकर्ते बाळासाहेबांच्या शिवसेनेत येत आहेत. पिंपरी-चिंचवड शहरात पक्षाचे संघटन मजबूत होत आहे. त्याचा आगामी महापालिका निवडणुकीत नक्कीच फायदा होईल.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *