पिंपरी : दुचाकी चोरणारी आंतरजिल्हा टोळी गजाआड;१७ दुचाकी जप्त, पिंपरी-चिंचवड पोलिसांची कामगिरी

पिंपरी: शहरात दुचाकी मोटारींच्या चोरीच्या घटना वाढत असताना पोलिसांनी अशाप्रकारचे गुन्हे करणारी टोळी चाकणला गजाआड केली आहे. आरोपींकडून १० लाख रूपये किंमतीच्या १७ मोटारी जप्त करण्यात आल्या आहेत. आरोपी नगरहून पुणे जिल्ह्यात येत होते आणि चोरलेल्या दुचारी नगर जिल्ह्यात ओळखीच्या नागरिकांना विकत होते, असे तपासात निष्पन्न झाले आहे.

प्रज्वल प्रताप देशमुख (वय २० वर्षे), अक्षय लहानू जाधव, (वय २७ वर्षे), तुषार भारत फटांगरे (वय-२१, सर्व राहणार, संगमनेर, नगर) अशी आरोपींची नावे आहेत. आणखी एक अल्पवयीन गुन्हेगारही यात सहभागी आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चाकणला एका दुचाकीवरून तीन इसम संशयीतरित्या चालले होते. पोलिसांना पाहताच ते पळू लागले. तेव्हा पोलीस कर्मचारी सचिन मोरे व प्रमोद गर्जे यांनी, एक किलोमीटरपर्यंत पाठलाग करून त्यांना पकडले. प्रज्वल प्रताप देशमुख, अक्षय लहानू जाधव अशी नावे त्यांनी पोलिसांना सांगितली. सखोल चौकशी केल्यानंतर त्यांनी म्हाळुंगे, चाकणसह अनेक ठिकाणी वाहनचोरी केल्याचे सांगत तुषार फटांगरे व एक अल्पवयीन आरोपी या गुन्ह्यात सहभागी असल्याची कबुली दिली.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर काटकर तसेच पोलीस अंमलदार प्रमोद गर्जे , सचिन मोरे , फारूक मुल्ला , अमित खानविलकर , गणेश महाडीक , महादेव जावळे , जावेद पठाण , विशाल भोईर , बाळु कोकाटे , मनोजकुमार कमले , उमाकांत सरवदे , मारुती जायभाये , अजित रूपनवर , प्रमोद हिरळकार , स्वप्निल महाले यांच्या तपास पथकाने ही कामगिरी केली आहे.

पुण्यात वाहनचोरी, नगरमध्ये विक्री

पिंपरी चिंचवड, पुणे ग्रामीण, नाशिक आदी परिसरातून दुचाकी चोरून त्या संगमनेर, पाथर्डी, अकोले येथे ओळखीच्या नागरिकांना विकल्याचे तपासामध्ये उघड झाले आहे. आरोपी संगमनेरहून दुचाकीवरून येऊन चाकण, राजगुरुनगर, नारायणगाव, आळेफाटा व नाशिक परिसरातील मोटारींची चोरी करून रातोरात परत जात होते. चोरलेल्या मोटारी विकताना कागदपत्र नंतर देतो असे ते सांगत होते. अशाप्रकारे विकलेल्या १७ मोटार सायकली पोलिसांनी जप्त केल्या आहेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply