पाकिस्तानचे अफगाणिस्तानवर हवाई हल्ले; सुमारे ३० जणांचा मृत्यू?

अफगाणिस्तानमध्ये पाकिस्तानी लष्कराने केलेल्या हवाई हल्ल्यात किमान ३० अफगाण नागरिक ठार किंवा जखमी झाल्याची माहिती टोलो न्यूजने दिली आहे. अफगाणिस्तानात पाकिस्तानी सैन्याने केलेल्या हवाई हल्ल्यात मुळे आणि महिला ठार झाल्याची माहिती आहे. 

पाकिस्तानी विमानांनी कुनारमधील शिल्टन भागात आणि खोस्टच्या स्पराई जिल्ह्यातील एका भागाला धडक दिली. ज्यात नागरिकांचा मृत्यू झाला, असे प्रत्यक्षदर्शीने टोलो न्यूजला सांगितले. मात्र, पाकिस्तान सरकार आणि अफगाणिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने अद्याप या प्रकरणी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

कुनारमधील स्थानिक अधिकाऱ्यांनी अद्याप या प्रकरणावर भाष्य केलेले नाही. परंतु, खोस्ट सुरक्षा विभागाच्या प्रवक्त्याने या घटनेची पुष्टी केली. परंतु, त्यांनी नागरिकांच्या हताहतीचे तपशील दिले नाहीत. पाकिस्तानी लष्करी विमानांनी या भागातील वझिरीस्तान स्थलांतरित छावणीला धडक दिल्याने किमान ३० लोक ठार झाले किंवा जखमी झाले आहे. कुनारमध्ये पाकिस्तानी सैन्याने केलेल्या हवाई हल्ल्यात पाच जण ठार झाल्याची पुष्टी प्रत्यक्षदर्शींनी केली आहे.

तालिबान काबूलमध्ये आल्यापासून पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील सीमेवर तणाव (Border tension) वाढला आहे. सीमेबाबत दोन्ही बाजूंमध्ये मतभेद असल्याचे जाणकारांचे मत आहे. स्थानिक मीडिया रिपोर्ट्सनुसार, तालिबान आणि पाकिस्तानी सैन्याने दक्षिण-पश्चिम अफगाणिस्तानच्या निमरोझ प्रांतात ड्युरंड रेषेजवळ हाय अलर्टवर आहेत. अलीकडेच पाकिस्तानी लष्करी हेलिकॉप्टर पाडण्यात आले होते.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply