पाकव्याप्त काश्मीर परत घेण्यासाठी हालचालींना वेग? लष्करातील बड्या अधिकाऱ्याचं मोठं विधान

भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काही दिवसांपूर्वी पाकव्याप्त काश्मीरबाबत सूचक विधान केलं होतं. पाकव्याप्त काश्मीरचा लवकरच भारतात समावेश केला जाईल, असं विधान राजनाथ सिंह यांनी केलं होतं. हे विधान ताजं असताना आता भारतीय लष्करातील बड्या अधिकाऱ्यानं मोठं विधान केलं आहे. भारत सरकारने आदेश दिल्यास पाकव्याप्त काश्मीर भारताला जोडण्यासाठी भारतीय सैन्य तयार आहे, असं विधान लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी केलं आहे.

लेफ्टनंट जनरल पदावरील अधिकाऱ्याने अशाप्रकारचं वक्तव्य केल्याने चर्चांना उधाण आलं आहे. पाकव्याप्त काश्मीर पुन्हा भारताला जोडण्यासाठी हालचालींना वेग आल्याचे संकेत मिळत आहेत.

लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी पत्रकार परिषदेत म्हणाले, “जसं आपल्याला माहीत आहे की, पाकव्याप्त काश्मीर भारताला जोडण्याबाबतचा प्रस्ताव संसदेत पाठवला आहे. त्यामुळे यामध्ये काहीही नवीन नाही. हा संसदेतील प्रस्तावाचा एक भाग आहे. आता उरला प्रश्न भारतीय सैन्यांचा… तर भारत सरकारने दिलेला कोणताही आदेश अमलात आणण्यासाठी भारतीय सैन्य तयार आहे. जेव्हा याबाबतचा आदेश दिला जाईल, तेव्हा आम्ही पूर्ण तयारीने पुढे जाऊ…” असं विधान उपेंद्र द्विवेदी यांनी केलं आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply