पर्यावरण रक्षण जनजागृतीसाठी पाच माहितीपटांची निर्मिती

पुणे : जिल्ह्यातील गावा-गावांत पर्यावरण रक्षणाबाबत जनजागृती करण्यासाठी पुणे जिल्हा प्रशासनाच्यावतीने पाच माहितीपटांची निर्मिती करण्यात आली आहे. यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून निधी उपलब्ध करून दिला आहे. हे माहितीपट लघुचित्रफितीच्या माध्यमातून गावा-गावांत दाखविले जाणार आहेत. यासाठी जिल्ह्यातील ३०० गावांमध्ये चित्ररथ जाणार असल्याचे शुक्रवारी (ता.२५) जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.

पुणे जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने या माहितीपटांची निर्मिती करण्यात आली आहे. यासाठी ‘वनवणवा नियंत्रण व जैवविविधता’ ही संकल्पना वापरण्यात आली आहे. हे माहितीपट वनक्षेत्र अधिक असलेल्या तालुक्यांमधील गावांमध्ये दाखविले जाणार आहेत. यानुसार सध्या दौंड, इंदापूर, पुरंदर, खेड, जुन्नर, आंबेगाव तालुक्यातील नागरिकांना माहितीपटाद्वारे पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यात येत आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply