पनवेल परिवहन कार्यालय सुसाट; तब्बल ३५४ कोटी ३१ लाख रुपयांचा महसूल जमा

नवीन पनवेल : पनवेल येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (Regional transport office) वर्षभरामध्ये तब्बल ३५४ कोटी ३१ लाख रुपयांचा महसूल (Revenue collection) जमा केला आहे. मागील वर्षाच्या तुलनेत १०४ कोटी ८८ लाखांची वाढ आहे. कार्यालयाने ८१.६९ टक्के उद्दिष्ट पूर्ण केले. एप्रिल २०२१ ते मार्च २०२२ पर्यंत सुमारे ४० हजार ४४१ नवीन वाहनांची नोंदणी  प्रादेशिक परिवहन कार्यालयात झाली.

पनवेल आणि परिसरातील नागरिकांनी दुचाकीला अधिक पसंती दिली असून २२ हजार १९१ दुचाकींची नोंद झाली, अशी माहिती उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अनिल पाटील यांनी बुधवारी दिली. १२ हजार ४६३ चारचाकी वाहनांची नोंद झाली आहे. पनवेल शहराचा आणि परिसराचा विकास झपाट्याने वाढत आहे. त्याच प्रमाणात लोकसंख्याही वाढत आहे. येथील रहिवासी हे मुंबई, नवी मुंबई, ठाणे, तळोजा, एमआयडीसी या परिसरात नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने प्रवास करतात. त्यामुळे या ठिकाणी दुचाकीची अधिक खरेदी होते. पार्किंगच्या समस्येमुळेही दुचाकीला महत्त्व दिले आहे, अशी माहितीही दिली.

पनवेल परिसरातील वाहनधारकांमध्ये आकर्षक क्रमांकाची क्रेझ वाढत असल्याचे दिसून येत आहे. येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयाने आकर्षक क्रमांकाद्वारे वर्षभरात तब्बल पाच कोटी ४४ लाख ५० हजारांचा महसूल जमा केला. एप्रिल २०२० ते मार्च २०२१ पर्यंत सुमारे पाच हजार ८१२ वाहनांना वाहनमालकांनी आकर्षक क्रमांक घेतले आहेत. मागील वर्षीच्या तुलनेने या वर्षी महसुलामध्ये वाढ झाली असून तरुण पिढीमध्ये आकर्षक क्रमांकाची आवड असल्यामुळे महसुलात वाढ होत आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply