पुणे – न्यायालय, राज्य सरकार व कुटुंबाची बनावट कागदपत्रे सादर करून फसवणुक

पुणे - दुसऱ्याच्या मिळकतीमध्ये (Property) स्वतःचा ताबा दाखविण्यासाठी, त्यांच्या जमीनीवर (Land) स्वतःचे घर (Home) असल्याची खोटी व बनावट कागदपत्रे (Bogus Documents) बनवून ती भुमी अभिलेख व न्यायालयाकडे (Court) सादर करीत राज्य सरकारची (State Government) व न्यायालयाचीच फसवणूक (Cheating) केल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. हा प्रकार जांभुळवाडी कोळेवाडी परिसरात घडला असून याप्रकरणी भारती विद्यापठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बाळासाहेब बबन जांभळे, जालींदर जांभळे, प्रभाकर जांभळे (सर्व रा. जांभुळवाडी, ता. हवेली) यांच्यासह तीन महिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अजय श्रीहरी जांभळे (वय 32, रा. आंबेगाव खुर्द ) यांनी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना मार्च 2018 ते एप्रिल 2022 या कालावधीत जांभुळवाडी, कोळेवाडी येथे घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अजय जांभळे व त्यांच्या कुटुंबीयांची जांभुळवाडीमधील सर्व्हे क्रमांक 67 येथे स्वतःची मिळकत आहे. मिळकतीच्या सातबारा उताऱ्यावर त्यांचा व त्यांच्या कुटुंबीयांच्या मालकी हक्क आहे. असे असतानाही फिर्यादीच्या मालकी हक्काच्या मिळकतीमध्ये स्वतःचा ताबा दाखवण्यासाठी बाळासाहेब जांभळे, जालिंदर जांभळे व माजी सरपंच महिलेसह इतरांनी संबंधित जमीनीवर स्वतःच्या नावावर घर असल्याचा खोटा व बनावट आठ अचा उतारा जांभुळवाडी कोळेवाडी या ग्रुप ग्रामपंचायतीमध्ये बनविला. तसेच फिर्यादीच्या जमिनीची मोजणी होऊ नये, यासाठी संशयित आरोपींनी 2018 मध्ये भुमी अभिलेख कार्यालयातही तोच खोटा उतारा खरा असल्याचे भासवून त्याचा गैरवापर केला. या खोट्या कागदपत्रांच्या आधारे त्यांनी 18 जानेवारी 2022 मध्ये दिवाणी न्यायालयात दावा दाखल केला.

त्यानुसार, उताऱ्यावरील 14 एकर 18 गुंठे 66 चौरस फुट मिळकतीपैकी 10 एकर 20 गुंठे जमीनीवर बाळासाहेब जांभळे, जालिंदर जांबळे, प्रभाकर जांभळे यांच्यासह तीन महिलांचा ताबा आहे, असे खोटे कथन केले. या दाव्यासोबत त्यांनी सर्व्हे क्रमांक 67 मधील खोटे व बनावट आठ अचा उतारा दाखल करुन संशयित आरोपींनी न्यायालयाची, शासनाची व फिर्यादीच्या कुटुंबाची फसवणूक केल्यामुळे त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक वैभव गायकवाड करीत आहेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply