नाशिक : सावकारांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या

नाशिक : सावकारांच्या जाचाला कंटाळून एकाने आत्महत्या केल्याप्रकरणी तिघा सावकारांवर गुन्हा दाखल झाला आहे. अरुण बोधले, विजय लहामगे, चंद्रेश लोढया अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. याप्रकरणी प्रणाली दिलीप रौंदळ (वय १९, तलाठी कॉलनी, तारवालानगर म्हसरुळ) या युवतीच्या तक्रारीवरुन तिघा सावकारांवर आत्महत्येला प्रवृत्त केल्या प्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दिलीप दयाराम रौंदळ (वय ४०) यांनी सोमवारी (ता. २१) मार्चला सव्वा नउच्या सुमारास औरंगाबाद रोडवरील मिर्ची हॉटेल चौकाजवळ खुशाल ट्रान्सपोर्ट भागात विष घेउन आत्महत्या केली होती. मृत दिलीप यांनी तिघा संशयितांकडून घेतलेल्या पैशाच्या वसूलीपोटी तिच्या वडिलांनी मानसिक व शारीरिक छळाला कंटाळून आत्महत्या केल्याचे म्हटले आहे.


राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *