नाशिक महापालिकेचा कोरोनावर चार कोटी खर्च

नाशिक - कोरोना रुग्णांवर उपचारापोटी महापालिकेला चार कोटीचा भूर्दंड सोसावा लागला. मात्र, इतर महापालिकांच्या तुलनेत हा खर्च कमी असल्याचा आरोग्य विभागाचा दावा आहे. शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर महापालिकेने रुग्णांवर विशेष लक्ष केंद्रित केले होते. प्रत्येक रुग्णाला उपचार मिळालेच पाहिजे, या ध्येयाने महापालिका आरोग्य यंत्रणा कार्यरत झाली. आरोग्य यंत्रणा सक्रिय झाली. महापालिकेच्या स्वतःच्या डॉ. झाकिर हुसेन आणि नाशिक रोडला नवीन बिटको रुग्णालयात सोय असल्याने रुग्णालय उभारणीचा खर्च महापालिकेला करावा लागला नाही. फक्त स्वतंत्र कोविडसाठी म्हणून ही दोन्ही रुग्णालय सुरू करावी लागली.

लसीकरणासाठी स्वतःच्या आरोग्य केंद्रात महापालिकेला सोय करावी लागली. मात्र, त्यासाठी आवश्यक असलेल्या लस शासनाकडून प्राप्त झाल्याने त्यासाठी खर्च करावा लागला नाही. कोरोना परिस्थिती हाताळताना महापालिकेने रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून विशेष लक्ष दिले होते. कुठलाही रूग्ण उपचाराविना राहता कामा नये याकडे लक्ष देवून जीव संकटात घालून वैद्यकीय कामकाज सुरू होते. या काळात अत्यावश्यक असलेले ९५ मास्क, सॅनिटायझर, औषधोपचाराबाबत कमतरता पडू न देता या अत्यावश्यक साहित्याची खरेदी करण्यात आली. या खरेदीत कमीत कमी किमतीच्या चांगल्या वस्तू खरेदी करण्यावर लक्ष दिले. रुग्णांच्या वैद्यकीय सुविधेसाठी महापालिकेने आवश्यक लागणाऱ्या साहित्याची मात्र खरेदी करताना महापालिकेला मोठा भुर्दंड सोसावा लागला. चांगली सुविधा देण्याकडे लक्ष दिले. या प्रयत्नातून दोन वर्षात चार कोटी रुपये खर्च आला. शासकीय रुग्णालयाप्रमाणे खासगी रुग्णालयही हाऊसफुल झाले. काही वेळा उपचारासाठी बेड मिळणे अवघड झाले होते.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply