नाशिक: राज्यात भोंग्यांबाबत राजकारण तापलं असताना कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी नाशिक पोलिसांनी पावलं उचलायला सुरुवात केली आहे. नाशिक जिल्ह्यातील मशिदींसह इतर धार्मिक स्थळांवरील भोंग्यांच्या आवाजाचे प्रमाण (डेसिबल) मोजण्यास नाशिक ग्रामीण पोलिसांकडून सुरुवात झाली आहे. नाशकातील सय्यद पिंप्री गावात पोलिसांनी मशिदीवरील भोंग्याच्या आवाजाचे प्रमाण मोजले आहे. दिवसा 55 डेसिबल तर रात्री 45 डेसिबल पेक्षा जास्त आवाज असल्यास पोलिसांकडून कारवाई करण्यात येणार आहे. राज ठाकरे यांच्या इशाऱ्यानंतर खबरदारी म्हणून नाशिक ग्रामीण पोलिसांनी उपाययोजना सुरू केली आहे.
नाशिकच्या मालेगावसह जिल्ह्यातील सर्वच शहरांमधील धार्मिक स्थळांवरील भोंग्यांच्या आवाजाचे प्रमाण मोजण्यास सुरुवात झाली आहे. प्रदूषण नियामक मंडळाच्या अधिकाऱ्यांसह पोलिसांच्या संयुक्त पथकाकडून पाहणी करण्यात आली. पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार आवाजाचे प्रमाण अधिक आढळल्यास गुन्हा दाखल करून कारवाई केली जाणार आहे. त्याचप्रमाणे संभाव्य धार्मिक तणावाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचं सायबर सेल सक्रिय झालं असून जिल्ह्यातील सोशल मीडियावर ग्रामीण पोलिसांचा वॉच असणार आहे.
दरम्यान महाराष्ट्राचे डीजीपी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुमारे तासभर बैठक झाली. कुठल्याही कार्यक्रम किंवा धार्मिक सणांसाठी स्पिकर लावण्यापूर्वी सर्वांना परवानगी घ्यावी लागेल, असा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. परिस्थितीनुसार नियमांचे पालन करण्याचे स्वातंत्र्य पोलिस महासंचालकांनी महाराष्ट्रातील सर्व जिल्हा पोलिस अधिकारी यांना दिले आहे. लवकरच डीजीपी कार्यालयाकडून एक सामान्य मार्गदर्शक सूचना जारी केली जाईल जी संपूर्ण महाराष्ट्रात लागू असेल. जिल्ह्यातील परिस्थिती पाहून नियम कठोर किंवा सौम्य ठेवण्याचे नियम बैठकीत ठरवण्यात आले आहे.
शहर
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- प्रवाशांना दिलासा: नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढला, प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
महाराष्ट्र
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- इराण-इस्रायल संघर्षात मुंबईच्या खलाशाचा बळी; सोळंकी कुटुंबावर महिन्याभरात दुसरे दुःख
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले
- त्वचेला नैसर्गिक चमक हवी? बीटच्या साध्या उपायांनी मिळवा गुलाबी आणि निरोगी कांती!
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
देश विदेश
- Health - साधी डाळ बनवा चविष्ट: ५ झणझणीत तडके देण्याची सोपी कृती जाणून घ्या
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती



























Subscribe to my channel


