नाशिक : जिंदाल कंपनीतील अग्नितांडव दुसऱ्या दिवशीही कायम; परिसरात धुराचे लोट

नाशिकमध्ये वर्षाच्या पहिल्याच दिवशी दुर्दैवी घटना घडली. नाशिकच्या इगतपुरीमधील जिंदाल कंपनीला भीषण आग लागली. जिंदाल कंपनीला लागलेल्या आगीत दोन जखमी महिलांचा मृत्यू झाला आहे. तर १७ जण गंभीर जखमी झाले. जखमींवर नाशिकच्या सुयश रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दरम्यान, जिंदाल कंपनीतील अग्नितांडव दुसऱ्या दिवशीही कायम आहे. परिसरात अद्यापही धुराचे लोट दिसत आहे. अग्निशमन दलाचे जवान आज पुन्हा फोमच्या मदतीनं आग विझवण्याचे प्रयत्न करणार आहेत. वेळ पडल्यास आग विझवण्यासाठी हेलिकॉप्टरमधून फोम टाकून आगीवर नियंत्रण मिळवणार असल्याची माहिती समोर आली आहे.

जिंदाल कंपनीला लागलेल्या आगीत मृत झालेल्या दोन महिला कर्मचारी होत्या. महिमा आणि अंजली असे दोघांची नावे आहे. महिमा यांचे वय २० होते तर अंजली यांचे वय २७ असून दोघांचाही या आगीत मृत्यू झाला आहे. इतर दोघांवर उपचार सुरू आहेत. दोघांच्याही प्रकृतीत सुधारणा होत आहे. तर नाशिक जिंदाल कंपनीमध्ये लागलेल्या आगीत मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत दिली जाणार आहे.

नाशिकच्या इगतपुरीमधील जिंदाल कंपनीला भीषण आग लागली. जिंदाल कंपनीला लागलेल्या आगीत दोन जखमी महिलांचा मृत्यू झाला असून या घटनास्थळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट दिली. जिंदाल कंपनीला आग लागल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. पाहणीनंतर मुख्यमंत्र्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, 'सदर घटना अतिशय गंभीर आहे. ज्वलनशील पदार्थामुळे आग भडकली. आग विझविण्यासाठी आपली यंत्रणा काम करत आहे. जखमी कामगारांमध्ये दोन जणांची प्रकृती अतिशय गंभीर आहे'. तसेच मृतांच्या वारसांना ५ लाखांची मदत जाहीर केली आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply