नाशिकहून गोवा व बेंगळुरुसाठी थेट विमानसेवा

नाशिक : गेल्या अनेक वर्षांपासून नाशिककर वाट पाहत असलेल्या गोवा व बेंगळुरू या माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रात आघाडीवर असलेल्या शहरांशी हवाईसेवेने जोडले जाणार आहे. स्पाइस जेट कंपनीच्या वतीने सप्टेंबर व ऑक्टोबर या सीझनमध्ये ओझर विमानतळावरून दररोज सेवा राहणार आहे. 

केंद्र सरकारच्या उडान योजनेंतर्गत ओझर विमानतळावरून सध्या अहमदाबाद- पुणे- हैदराबाद दिल्ली या महत्त्वाच्या शहरांमध्ये हवाई सेवा सुरू आहे आता २५ सप्टेंबर ते १९ ऑक्टोबर या सीझनमध्ये गोवा व बेंगळुरुसाठी हवाई सेवा सुरू होत आहे.

दुपारी साडेबारा वाजता बेंगळुरु होऊन विमानाचे उड्डाण होईल दुपारी दोन वाजून ३५ मिनिटांनी ओझर तळावर विमान उतरेल. त्यानंतर दोन वाजून पंचावन्न मिनिटांनी विमानाचे उड्डाण होईल तीन वाजून ५५ मिनिटांनी गोव्याला पोहचेल.

गोव्याहून साडेपाच वाजता विमानाचे नाशिकसाठी उड्डाण होईल. संध्याकाळी सहा वाजून ३५ मिनिटांनी ओझर विमानतळावर आगमन होईल सहा वाजून ५५ मिनिटांनी पुन्हा बेंगळुरुसाठी विमानाचे उड्डाण होईल. दोन महिन्यांसाठी विमानसेवा असली तरी स्पाइस जेट कंपनीच्या वतीने ऑक्टोबरनंतर विंटर सिझनचे नियोजन केले जाणार आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply