नाशिकमध्ये शिवसेनेला खिंडार, जिल्हा संपर्कप्रमुख शिंदे गटात प्रवेश करणार?

नाशिक : शिवसेनेत मोठी फूट पडल्यानंतर ही शिंदे गटाकडून ठाकरे गटाला धक्के देण्याचं काम सुरुच आहे. नाशिकमध्ये शिवसेनेच्या ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत रात्री नागपूरच्या येथील रामगिरी निवासस्थानी हा प्रवेश होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.

शिवसेना ठाकरे गटाने भाऊसाहेब चौधरी यांच्या कारवाई करत पक्षातून हकालपट्टी केली आहे. शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी ट्वीट करून माहिती दिली आहे. भाऊसाहेब चौधरी थोड्याच वेळात एकनाथ शिंदे गटात दाखल होण्याची शक्यता आहे.

शिवसेना नाशिक जिल्हा संपर्क प्रमुख भाऊ चौधरी यांची शिवसेना तसेच संपर्क प्रमुख पदावरून हकालपट्टी करण्यात येत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने ही कारवाई करण्यात येत आहे, असं संजय राऊत यांनी म्हटलं. 

भाऊसाहेब चौधरी गेल्या काही वर्षांपासून नाशिकचे संपर्कप्रमुख म्हणून काम करत होते. भाऊसाहेब चौधरी हे संजय राऊत यांचे अत्यंत निकटवर्ती म्हणून मानले जात होते. भाऊसाहेब चौधरी शिंदे गटात गेल्याने संजय राऊत यांना मोठा धक्का मानला जात आहे.विशेष म्हणजे मागील आठवड्यात संजय राऊत नाशिकमध्ये आलेले असताना भाऊ चौधरी दिवसभर त्यांच्यासोबतच होते.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *