नाशिकजवळ रुळावरून घसरले रेल्वेचे डब्बे; अपघातात काही जण जखमी

नाशिक : नाशिक रोड रेल्वे स्टेशन जवळ असणार्‍या लहवित जवळ रेल्वेचे डबे लाईन तुटून पडल्याची माहिती मिळत आहे. अनेक लोक जखमी झालेले आहेत. रेल्वे पोलिस आणि आर पी एफ घटनास्थळी याठिकाणी मार्गक्रमण करीत आहे. अशी माहिती माहिती मिळत आहे. पवन एक्सप्रेस नाशिकच्या 12 km पाहिले रुळावरून खाली उतरली आहे. काही लोक गंभीर जखमी झाले आहेत. (LTT- Jaynagar Express derails between Lahavit Devlali near Nashik)

नाशिकजवळील लहवित - देवळाली स्थानकादरम्यान लोकमान्य टिळक टर्मिनस- जयनगर एक्स्प्रेसचे काही डबे रुळावरुन घसरल्याची घटना रविवारी दुपारी घडली. या अपघातात काही प्रवासी जखमी झाले असून रेल्वे पोलिस, वैैद्यकीय पथक घटनास्थळाकडे रवाना झाले आहेत.

रविवारी दुपारी तीन वाजून दहा मिनिटांच्या सुमारास नाशिकजवळील लहवित- देवळाली या स्थानकादरम्यान डाऊन मार्गावर एलटीटी - जयनगर एक्स्प्रेसचे डबे रुळावरुन घसरले. रेल्वे रुळाला तडे गेल्याने हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंंदाज आहे. मात्र, अपघाताचे नेमके कारण काय, याबाबत रेल्वेकडून अद्याप स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. मध्य रेल्वेने ट्विटरवर अपघाताची माहिती दिली असून यात मदत पथक घटनास्थळी रवाना झाल्याचे म्हटले आहे.

ट्रेनमधील प्रवाशांनी वृत्तवाहिन्यांना दिलल्या माहितीनुसार, अपघातस्थळी मदत पथक अद्याप पोहोचलेले नाही.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply