नागपूर : 'हे वादळ दोन दिवसात शांत होईल, सरकार पडणार नाही; आमदारही परत येतील'

नागपूर : राज्यात आत्ता सुरु असलेला प्रकार क्षणिक असून हे सर्व वादळ दोन दिवसात संपेल आणि गुवाहाटीला गेलेल आमदारही मागे येतील यात शंका नसल्याचा विश्वास अपक्ष आमदार देवेंद्र भुयार यांनी व्यक्त केला आहे. नागपूर विमानतळावरून मुंबईला निघाले असता भुयार यांनी माध्यमांशी संवाद साधला.

यावेळी त्यांनी सांगितलं, ' उद्या सिल्वर ओकवर बैठक आहे. त्या बैठकीसाठी मी मुंबईला निघालो आहे, शिवाय काळजी करु नका, मी गुवाहाटीला जाणार नाही, अशी मिश्कील टिप्पणी देखील भुयार यांनी यावेळी केली.

यावेळी माध्यमांनी सध्याच्या राजकीय घडामोडींबाबत त्यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले, 'मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ आहे. मला कितीही प्रलोभने दिली तरी मी त्यांच्यासोबत शिंदे गटासोबत जाणार नाही. तसंच माझा प्रवास ठरलेला आहे, तो प्रवास सिल्वर ओकचा आहे. महाविकास आघाडी एक विचार घेऊन जन्माला आलेली आहे.

मुख्यमंत्र्याना प्रशासकीय अनुभव कमी आहे. काही लोकांनी मुख्यमंत्र्यांशी संपर्क होऊ दिला नाही. तसंच यावेळी सेनेच्या आमदारांकडून राष्ट्रवादीकडून करण्यात येणाऱ्या निधीवाटपातील दुजाभाव याबाबत प्रश्न विचारला असता ते म्हणाले, 'राष्ट्रवादीचा काहीही संबंध नाही, प्रत्येक मंत्र्याच्या खात्याचा परफॉर्मन्स बघा, शिवाय आमदारांच्या परफॉर्मन्सवरती भरीव निधीसाठी तरतुद करायची की नाही हे ठरत. मात्र, काम करायची नाहीत सत्ता भोगायची आणि खापर फोडायचं असा टोलाही त्यांनी नाराज शिवसेनेच्या आमदारांना लगावला.

तसंच शिवसेनेतील आमदारांनी बंडखोरी केली आहे मात्र, त्यांचा आरोप खरा आहे की मुख्यमंत्री हे वेळ देत नव्हते आणि नाराजी मी पहिल्यांदा बोलून दाखवली होती. त्यासाठी हे पाऊल उचलण्याची गरज नाही. हे वादळ दोन दिवसात शांत होईल आणि सरकार पडणार नाही असं त्यांनी सांगितलं.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply