नागपूर : माणुसकीला काळिमा! नवजात बाळास पित्यानेच विकल्याचा धक्कादायक प्रकार

नागपूर : नागपुरात एका नवजात बाळाला पित्यानेच विकल्याचा प्रकार समोर आला असून याप्रकरणी पाचपावली पोलिसांनी 2 आरोपींना अटक केली आहे. पिता उत्कर्ष दहिवले आणि मध्यस्थ महिला उषा सहारे हे या प्रकरणातील आरोपी आहेत. नागपूरच्या पाचपावली पोलीस स्टेशन हद्दीतील राणी दुर्गवती चौकात भंडारा जिल्ह्यातून कामाच्या शोधत आलेले एक दाम्पत्य राहत होते. दोघेही मोलमजुरी करत होते.

मात्र, पती उत्कर्ष हा दारुडा होता. नुकतीच त्याला मुलगी झाली. मात्र, त्याच्या संपर्कात उषा सहारे नावाची महिला आली आणि तिने त्याला पैसे मिळवून देण्याचे आमिष दाखवले. उषा सहारे खाजगी अनाथ आश्रमात काम करते. तिने उमरेड मधील एका गरजू दांपत्याला पकडले आणि त्यांना तिने नेमके काय सांगितले हे अद्याप स्पष्ट नाही. मात्र, उत्कर्ष याला 70 हजार रुपये देण्याचं ठरलं आणि त्याने आपल्या नवजात बाळाला विकलं. मात्र, बाळाच्या आईला याची माहिती मिळताच तिने पोलीस स्टेशन गाठलं आणि तक्रार दिली.

पोलिसांनी बाळाच्या पित्याला आणि दलाल महिलेला याप्रकरणी अटक केली असून आता यात हे बाळ विकत घेणाऱ्यांचा नेमका उद्देश काय आहे याचा तपास पोलीस करत आहेत. मध्यस्थी करणाऱ्या महिलेने बाळ  विकत घेणाऱ्या घेणाऱ्या दांपत्याला काही वेगळीच माहिती दिली असावी असा अंदाज आहे. त्यांना बाळ नसल्याने त्यांनी उषा सहारेच्या बोलण्यात येऊन पैसे दिले. तर, त्या बाळाचा बाप मात्र दारुडा असल्याने त्याने हे कृत्य पैश्यासाठी केलं असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *