नागपूर : धक्कादायक, पेट्रोल पंपावर हत्या, हल्लेखोरांनी सीसीटीव्ही फोडून डीव्हीआर नेला सोबत

नागपूर : नागपूर शहरातील शंकरनगर चौकातील पेट्रोल पंपावरच  काल मध्यरात्री एकाची हत्या करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. हत्या करण्यात आलेली व्यक्ती ही गुंडाचा भाऊ असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, नागपुरात पोलिसांचा  धाक नसल्याचे या निमित्ताने पुन्हा एकदा समोर आले आहे. 

 हत्या करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव शहारोज उर्फ सोनू खान ( 42 ) असे आहे.  काल रात्री 11 च्या सुमारास जिमवरुन परत येताना शंकरनगर पेट्रोल पंपावर हा हल्ला करण्यात आला. शहरोज यांच्यावर काहींनी पाळत ठेवल्याचे समोर आले आहे. ऑटोमधून आधीपासून पाठलाग करत आलेल्या हल्लेखोरानी शंकर नगर पेट्रोल पंपावर अनेकांच्या देखत शहरोज याच्यावर हल्ला चढवला आणि या हल्ल्यात त्याचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. 

शहरोज हा नागपूरचा कुख्यात गुंड शेखुखान याचा भाऊ असल्याची माहिती असून जुन्या वैमानस्यातून ही घटना घडली आहे का, अशी शंका पोलिसांनी व्यक्त केली आहे. हल्लेखोरांनी हत्येच्या घटनेनंतर पेट्रोल पंपाचे सर्व सीसीटीव्ही फोडून आणि डीव्हीआर सोबत घेऊन गेले आहेत आहेत. पोलीस मारेकरींचा शोध घेत आहे. 

 



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *