नवी मुंबईत ५ गाड्यांचा विचित्र अपघात, एकाचा मृत्यू, अनेकजण जखमी, ३ किलोमीटरपर्यंत वाहतूक कोंडी

नवी मुंबईत रविवारी (१९ जून) झालेल्या दोन आपघातांमुळे शीव पनवेल महामार्गावर खारघर ते कळंबोलीपर्यंत प्रचंड वाहतूक कोंडी झाली. यात कामोठे येथे ५ गाड्यांच्या विचित्र अपघातात एकाचा मृत्यू झाला, तर पाच ते सहा जण जखमी झाले आहेत. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

नवी मुंबई कामोठे उड्डाणपुलावर रविवारी सकाळी आठच्या सुमारास एक विचित्र अपघात घडला. उड्डाणपुलावर बंद पडलेल्या ट्रकचे काम सुरू होते. त्याच वेळी मागून भरधाव येणाऱ्या व्हॅगन आर गाडी, इनोवा, एक ट्रक आणि एसटी महामंडळाची शिवनेरी बस एकमेकांवर धडकल्या. त्यात व्हॅगन आरमधील एका व्यक्तीचा मृत्यू झाला.

या शिवाय याच मार्गावर खारघर उड्डाण पुलावर एक ट्रक नादुरुस्त झाल्याने किरकोळ अपघात झाला. मात्र, सुमारे तीन किलोमीटरपर्यंत वाहतूक कोंडी झाली. त्यातच पाऊस पडत असल्याने सर्वाधिक दुचाकीस्वारांची तारांबळ उडाली.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply