नवी दिल्ली :  स्पाईसजेटच्या विमानाने उड्डाण घेतले अन् केबिनमध्ये सुरू झाले धराचे लोट

नवी दिल्ली : दिल्ली-जबलपूर स्पाईसजेट विमान धुरामुळे विमानाला दिल्ली विमानतळावर परत लँडिंग करावे लागले. ही घटना आज सकाळी घडली. अचानक झालेल्या या गोंधळामुळे प्रवाशांमध्ये गोंधळ पसरला होता. हे विमान ५ हजार फूट उंचीवर गेले होते. यावेळी अचानक विमानाच्या केबिनमध्ये धुराचे लोट पसरू लागले. धुराचे लोट दुसू लागताच वैमानिकाने विमानाचे लँडिंग केले. सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे दिल्ली विमानतळावर उतरवण्यात आले आहे.

या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये केबिनमध्ये धूर आल्याने सर्व प्रवासी वर्तमानपत्रे आणि पुस्तकांनी धूरापासून बचाव करत असल्याचे दिसत आहे.

विमानाच्या केबिन क्रूला विमानाच्या केबिनमध्ये धूर पसरत असल्याचे ५ हजार फुटांवरून जाताना दिसले. याचा व्हिडिओही समोर आला आहे. विमानातील धूर पाहून ते विमान पुन्हा दिल्ली विमानतळावर उतरवण्यात आले. प्रवाशांना सुखरूप उतरवण्यात आले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply