नवी दिल्ली: जहांगीपुरी परिसरात कोर्टाच्या आदेशानंतरही सुरु असलेलं अतिक्रमण काढण्याचे काम अखेर बंद

नवी दिल्ली: जहांगीरपुरी येथील झालेल्या हिंसाचाराचे वातावरण शांत झाल्यानंतर, उत्तर दिल्ली महानगरपालिकेने आज जहांगीरपुरी परिसरातील अतिक्रमणविरोधी मोहीम हाती घेतली होती. पण सर्वोच्च न्यायालयाने त्या कारवाईला बंदी आणली. सर्वाच्च न्यायालयाचा आदेश येवूनही जहांगीरपुरीत काही काळ बुलडोझर चालवून अतिक्रमण काढण्यात आले. पण नंतर दिल्ली महापालिकेने अतिक्रमणाची कारवाई थांबवली. सध्या येथील अतिक्रमणात काढलेलं बाजूला करण्याचे काम सुरु आहे. या अतिक्रमणावर बोलताना येथील महापौर राजा इक्बाल सिंह म्हणाले, आम्हाला अजुनही कोणताच कोणताही आदेश मिळालेला नाही.

जहांगीरपुरीच्या  मशिदीबाहेरच असलेला चबुतरा काढला आहे. सध्या या परिसरात वातावरण तणावपूर्ण आहे. या परिसरातील प्रत्येक घडामोडींवर पोलिसांची (Police) नजर आहे. पण, आता दिल्ली महापालिकेने ही कारवाई थांबवली आहे.

बुलडोझर प्रकरणातील याचिकाकर्त्यांची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील दुष्यंत दवे यांनी स्थानिक संस्थेचे हे पाऊल असंवैधानिक, अनैतिक आणि बेकायदेशीर आणि मनमानी असल्याचे म्हटले आहे. यासोबतच या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात तक्रार दाखल करण्यात आली आहे. दुष्यंत दवे म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही बुलडोझर थांबलेला नाही. हे पूर्णपणे चुकीचे आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply