पुणे : नवले पुलावर पुन्हा अपघात, कंटेनरची लेन तोडून चारचाकी गाडीला धडक

पुणे : पुण्यातील नवले ब्रिजवर झालेल्या भीषण अपघाताची देशभरात चर्चा झाली. रविवारी या अपघातामध्ये एका कंटेनरने चक्क २४ वाहनांना धडक दिली. या भीषण अपघातात १३ जण गंभीर जखमी झाले. तर कार, रिक्षा, दुचाकी अशा वाहनांचा चक्काचूर झाला होता. यानंतर आज पुन्हा त्याच ठिकाणी अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे.

आज पुन्हा झालेल्या अपघातात भरधाव वेगात असणारा कंटेनर रस्त्याच्या मध्ये असणाऱ्या दुभाजकावर जाऊन धडकला. या धडकेत २ चार चाकी गाड्यांचे नुकसान झाले असून हा ट्रक कात्रजच्या दिशेने मुंबईकडे जात होता. रविवारी झालेल्या भीषण अपघातनंतर आज पुन्हा त्याच ठिकाणी हा अपघात झाला आहे



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *